God
God चा उल्लेख असलेली वचने
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढे जात आहेत, ते तुमच्यावतीने त्यांच्याशी लढतील, जसे तुमच्या डोळ्यादेखत त्यांनी इजिप्त देशात आणि अरण्यात असताना केले. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेतो, त्याप्रमाणे याहवेह परमेश्वराने इथे पोहोचेपर्यंत तुमची सतत काळजी घेतली.”
And in the wilderness, where thou hast seen how that the LORD thy God bare thee, as a man doth bear his son, in all the way that ye went, until ye came into this place.
पण तरीही तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.
तुम्ही जे म्हटले ते याहवेहनी ऐकले आणि ते रागावले व त्यांनी शपथपूर्वक म्हटले:
“या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही.
परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.”
तुमच्यामुळे याहवेह माझ्यावरही रागावले व म्हणाले, “तू या वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस.
जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील.
तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.
परंतु याहवेह मला म्हणाले, “त्यांना सांग, ‘लढाई करण्यास वर जाऊ नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल.’ ”
तुम्हाला मी तसे सांगितले, पण तुम्ही माझे ऐकले नाही. उलट पुन्हा याहवेहच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ देशात शत्रूवर चाल करून गेले.
यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही.
नंतर आम्ही मागे वळून अरण्यामधून तांबड्या समुद्राकडे निघालो, कारण याहवेहनी मला तशी आज्ञा दिली होती आणि अनेक वर्षे आम्ही सेईर पर्वताच्या सभोवतालच्या प्रदेशात भ्रमण करीत राहिलो.
मग याहवेह मला म्हणाले,
त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे.
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्याला आशीर्वादित केले आहे. या विशाल अरण्यात तुमचे भटकणे त्यांनी पाहिले आहे, चाळीस वर्षे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत व तुम्हाला कशाचेही उणे पडले नाही.
तेव्हा याहवेह आम्हाला म्हणाले, “मोआबी लोकांना उपद्रव किंवा लढाईसाठी प्रवृत करू नका, कारण मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग वतन म्हणून तुम्हाला देणार नाही. मी लोटाच्या वंशजांना आर प्रदेश वतन म्हणून दिला आहे.”
पूर्वीच्या काळी होरी लोक सेईरमध्ये राहत असत, परंतु एसावाचे वंशज एदोमींनी त्यांना तिथून घालवून दिले व तिथे वस्ती केली. याहवेहने वतन दिलेल्या प्रदेशातून ज्याप्रमाणे इस्राएली लोकांनी तेथील लोकांना घालवून दिले होते त्याचप्रमाणे.)
पण कादेश-बरनेआहून निघून जेरेद ओहोळ ओलांडून जाण्यास आम्हाला तब्बल अडतीस वर्षे लागली, कारण याहवेहने घेतलेल्या शपथेमुळे लढाऊ पुरुषांची संपूर्ण पिढी छावणीतून नष्ट झाली होती.
त्या सर्वांचा नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून याहवेहचा हात त्यांच्यावर उगारलेला होता.
याहवेह मला म्हणाले,
जेव्हा तुम्ही अम्मोनी लोकांच्या भूमीत प्रवेश कराल, अम्मोनी लोकांना त्रास देऊ नका, कारण मी त्यांचा कोणताही प्रदेश तुम्हाला देणार नाही, तो सर्व मी लोटाच्या वंशजांना वतनादाखल दिला आहे.”
त्यांच्या वंशातील लोक धिप्पाड आणि संख्येने पुष्कळ होते. ते अनाकी लोकांइतके उंच होते, परंतु अम्मोनी लोकांपुढून त्यांना याहवेहने घालवून दिले व त्यांच्या नाश केला. त्यांच्या जागी अम्मोन्यांनी त्या देशात वस्ती केली.
जेव्हा तिथे राहणार्या होरी लोकांना त्यांनी घालवून लावले व त्यांचा नाश केला. त्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि आजपर्यंत त्यांच्या जागी ते वस्ती करून राहत आहेत, त्याचप्रमाणे सेईर येथे राहाणाऱ्या एसावाच्या वंशजांसाठीही याहवेहने असेच केले.
“आता उठा आणि आर्णोन नदी ओलांडून जा. पाहा, हेशबोनचा राजा अमोरी सीहोन आणि त्याचा देश मी तुमच्या हाती दिला आहे. तो देश ताब्यात घेण्यास सुरुवात करा व त्याच्याशी युद्ध करा.