मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.

  2. आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.

  3. याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;

  4. जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.

  5. परंतु याहवेहने तुम्हाला इजिप्तच्या तप्त लोखंडी भट्टीतून यासाठी सोडवून आणले की, तुम्ही त्यांचे खास निवडलेले लोक, त्यांचे वारसदार व्हावे, जसे तुम्ही आज आहात.

  6. पण तुमच्यामुळेच याहवेह माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला शपथपूर्वक सांगितले आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी वतनादाखल दिलेल्या त्या उत्तम देशात यार्देन ओलांडून तुला जाता येणार नाही.

  7. तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल.

  8. कारण याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणारे अग्नी व ईर्ष्यावान असे परमेश्वर आहेत.

  9. तुम्हाला जेव्हा मुले आणि नातवंडे होतील आणि त्या देशात तुम्ही बराच काळ वास्तव्य केल्यावर तुम्ही मूर्तिपूजा करून स्वतःला भ्रष्ट केले, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यावर अतिशय कोपायमान होतील,

  10. याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील.

  11. परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.

  12. तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.

  13. कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.

  14. परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्या आधी होऊन गेलेल्या दिवसांना विचारा आणि आकाशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत विचारा की, अशा प्रकारची महान गोष्ट पूर्वी कधी घडली होती का किंवा अशी गोष्ट कुठे घडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का?

  15. अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय?

  16. कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?

  17. त्यांनी या गोष्टी अशासाठी केल्या की, याहवेहच परमेश्वर आहेत हे तुम्हाला कळून यावे; त्यांच्यासारखा अन्य कोणीही नाही हे देखील समजावे.

  18. तुम्हाला बोध करण्यासाठी स्वर्गातून आज्ञा देण्यास त्यांनी तुम्हाला आपली वाणी ऐकविली, तसेच त्यांचा महान अग्निस्तंभही तुम्हाला या पृथ्वीतलावर दाखविला; आणि तुम्ही त्या अग्नीमधून येणारे त्यांचे शब्दही ऐकले.

  19. तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले,

  20. वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही.

  21. आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.

  22. याहवेह आपल्या परमेश्वराने होरेब पर्वतावर तुमच्याशी एक करार केला होता.

  23. याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी केला आहे.

  24. याहवेह पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी समोरासमोर बोलले.

  25. (त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.) आणि ते म्हणाले: