God
God चा उल्लेख असलेली वचने
फिलिप्प म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.”
येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’?
मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे.
फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा.
मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे.
आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.
आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—
त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे व तुम्ही मजमध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे.
ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन.”
येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.
जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.
परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल.
“मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे की, ‘मी जात आहे, परंतु मी तुम्हाकडे परत येईन.’ जर तुमची मजवर प्रीती असती, तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझे पिता मजपेक्षा थोर आहेत.
परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच मी तंतोतंत करतो. “आता उठा; आपण येथून जाऊ.”
“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.
तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.
“जशी पित्याने मजवर प्रीती केली, तशीच मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. आता तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.
जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल.
मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे, ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.
तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली. ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे.
माझ्या नावामुळे ते तुमच्याशी असे वागतील, कारण ज्यांनी मला पाठविले त्यांना ते ओळखीत नाहीत.
जो कोणी माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.
“जेव्हा कैवारी येईल, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो—तो माझ्याविषयी साक्ष देईल.
कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.