मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “आता मी तुमच्याकडे येत आहे, परंतु मी या जगात असतानाच हे सांगत आहे, यासाठी की माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा.

  2. तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे.

  3. सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.

  4. जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे.

  5. हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल.

  6. तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे,

  7. मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे.

  8. “हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.

  9. “हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे.

  10. मी तुमच्या नाव त्यांच्यासमोर प्रकट केले आहे, मी तुम्हाला प्रकट करीतच राहीन, जेणे करून जी तुमची प्रीती मजवर आहे ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”

  11. येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”

  12. तेव्हा यहूदी अधिकार्‍यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.”

  13. तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.

  14. येशू म्हणाले, “मला स्पर्श करू नको, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ”

  15. पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.”

  16. थोमाने म्हटले, “माझे प्रभू व माझे परमेश्वर!”

  17. परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे.

  18. परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाने मरेल, हे त्याला कळावे, म्हणून येशू असे बोलले. मग येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये!”

  19. त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले.

  20. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा.

  21. ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही.

  22. यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब लोक हे देखील आमच्यात आहेत. तरी देखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!”

  23. “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  24. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील.

  25. वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.