मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्‍यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे.

  2. या प्रार्थनेनंतर ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले.

  3. संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.”

  4. परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे.

  5. तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले.

  6. आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा.

  7. या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.”

  8. परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”

  9. तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी.

  10. मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.

  11. मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.”

  12. स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले.

  13. परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’

  14. परमेश्वर त्याच्याशी अशा रीतीने बोलले: ‘तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.

  15. परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’

  16. “कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते,

  17. “अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती.

  18. मोशेला वाटले की त्याच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही.

  19. ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’ हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

  20. इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’

  21. “त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले?’ असे विचारून पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले.

  22. “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील.’

  23. म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना आकाशातील सूर्य, चंद्र व ताऱ्यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे: “ ‘अहो इस्राएली लोकहो, रानात असताना चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे व यज्ञे आणली काय?

  24. तुम्ही मोलेख दैवताचा मंडप आणि शक्कुथ व तार्‍यांचे दैवत रेफान, उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या. म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’

  25. जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरून हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तिथेच राहिला.