मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली.

  2. परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव बघितले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले.

  3. तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.”

  4. म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.

  5. परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला.

  6. यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले.

  7. पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!

  8. या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही.

  9. तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील;

  10. फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.”

  11. ताबडतोब तो सभागृहात गेला आणि येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा उपदेश करू लागला.

  12. तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे.

  13. एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

  14. कर्नेल्याने त्याच्याकडे टक लावून पाहिले व भयभीत झाला. त्याने विचारले, “काय प्रभूजी?” देवदूत उत्तरला, “तुझ्या प्रार्थना आणि गरिबांसाठी केलेल्या दानधर्माची परमेश्वराला आठवण आहे.

  15. दुसर्‍या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.”

  16. त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल”

  17. तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला: “माझ्यासारख्या यहूदी व्यक्तीने गैरयहूदीयाला भेटणे व त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिले आहे की, मी कोणालाही अपवित्र किंवा अशुद्ध लेखू नये.

  18. आणि मला म्हणाला, ‘कर्नेल्या, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू गरिबांना केलेल्या दानधर्माची त्यांनी आठवण केली आहे.

  19. म्हणून मी ताबडतोब तुम्हाला बोलावून घेतले आहे, तुम्ही आला हे बरे झाले. आपण सर्व येथे परमेश्वराच्या समक्षतेत आहोत आणि प्रभूने जे सर्वकाही सांगण्याची आज्ञा देऊन तुम्हाला पाठविले आहे ते सांगा.”

  20. मग पेत्र बोलू लागला: “मला अगदी स्पष्टपणे कळून आले आहे की परमेश्वर पक्षपात करीत नाहीत,

  21. कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथकर येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते.

  22. परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले.

  23. जरी ते सर्व लोकांसमोर प्रकट झाले नाहीत, परंतु जे ज्यांना परमेश्वराने पूर्वीच निवडून ठेवले होते त्या साक्षीदारांसमक्ष म्हणजे आम्हाला, मरणातून उठल्यानंतर ते प्रकट झाले व त्यांनी आमच्याबरोबर खाणेपिणे केले.

  24. त्यांनी आम्हाला अशी आज्ञा केली आहे की, लोकांस उपदेश करा व साक्ष द्या, परमेश्वराने नेमलेले जिवंतांचे व मेलेल्यांचे न्यायाधीश हेच आहेत.

  25. कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांमधून बोलताना आणि परमेश्वराची स्तुती करताना ऐकले. मग पेत्र म्हणाला,