God
God चा उल्लेख असलेली वचने
परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले, म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते.
तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.” तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.”
येशूंनी त्यांना म्हटले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे.
जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्यांचे ऐकत नाही, याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”
येशू म्हणाला, “मला भूत लागलेले नाही, कारण मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.
तेव्हा येशूंनी त्यांना सांगितले, “मी स्वतः आपले गौरव केले, तर ते व्यर्थ आहे. परंतु माझा गौरव करणारे माझे पिता आहेत आणि त्यानांच तुम्ही आपला परमेश्वर मानता.
येशूंनी उत्तर दिले, “त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी.
जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही.
त्यांच्यापैकी काही परूशी म्हणाले, “हा मनुष्य परमेश्वरापासून आलेला नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” परंतु इतरांनी विचारले, “पण पातकी मनुष्याला अशी चिन्हे करता येतील का?” यावरून त्यांच्यामध्ये फूट पडली.
तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी पुन्हा दुसर्यांदा बोलावून सांगितले, “सत्य सांगून परमेश्वराचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे, हे आम्हाला माहीत आहे.”
आम्हाला माहीत आहे की परमेश्वर मोशेशी बोलले, परंतु याच्याबद्दल म्हणशील, तर तो कुठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही.”
आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात.
ही व्यक्ती परमेश्वरापासून नसती, तर हे करू शकली नसती.”
त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूंनी ऐकले आणि तो त्यांना भेटल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “तुझा मानवपुत्रावर विश्वास आहे का?”
तसेच माझे पिता मला ओळखतात आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो.
पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो;
तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात,
ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही.
मी आणि माझे पिता एक आहोत.”
परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?”
ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.”
ज्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले त्यास त्याने ‘दैवते’ म्हटले तर शास्त्रलेखाचा भंग होत नाही
तर ज्याला पित्याने स्वतः वेगळे करून जगात पाठविले, तो जर म्हणतो की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे,’ तर त्या विधानाला तुम्ही दुर्भाषण, असे कसे म्हणता?
मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका;