मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा इस्राएली लोकांनी ते पाहिले, ते एकमेकास म्हणू लागले, “हे काय आहे?” कारण ते काय होते ते त्यांना ठाऊक नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “हीच ती भाकर आहे जी याहवेहने तुम्हाला खाण्यासाठी दिली आहे.

  2. याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर एवढे घ्यावे.’ ”

  3. मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”

  4. मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही.

  5. मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार?

  6. हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.”

  7. मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्‍या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ”

  8. मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्‍या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.”

  9. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल.

  10. सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते.

  11. तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”

  12. मग मोशेने याहवेहकडे आरोळी मारली, “मी या लोकांचे काय करू? ते तर मला धोंडमार करण्याच्या तयारीत आहेत.”

  13. मग याहवेहने मोशेला सांगितले, “लोकांच्या समोर जा. काही इस्राएली वडिलजनांना आपल्याबरोबर घे आणि नाईल नदीवर ज्या काठीने मारले ती आपल्या हाती घे आणि नीघ.

  14. होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.

  15. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबाह असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली.

  16. मोशे यहोशुआला म्हणाला, “आपल्यातून काही माणसे निवड आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी युद्ध करा. उद्या मी परमेश्वराची काठी माझ्या हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन.”

  17. मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.”

  18. तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.”

  19. आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.

  20. दुसर्‍या मुलाचे नाव एलिएजर असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.”

  21. इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला.

  22. मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली.

  23. इजिप्तच्या लोकांच्या हातातून इस्राएलची सुटका करण्यासाठी याहवेहने जी चांगली कृत्ये केली, ती ऐकून इथ्रोला फार आनंद झाला.

  24. इथ्रो म्हणाला, “याहवेहचे नाव धन्यवादित असो, ज्यांनी तुला इजिप्त व फारोहच्या तावडीतून सोडविले आणि ज्यांनी लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातातून सोडविले.

  25. आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.”