मुख्य मजकुरावर जा

Aaron

331 वचने · 9 कुटुंब सदस्य

Aaron चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत.

  2. “अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत:

  3. याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,

  4. “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये.

  5. तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.

  6. अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांना मोशेने हे सांगितले.

  7. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे.

  8. “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,

  9. “अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले,

  10. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा.

  11. या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्‍या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.”

  12. तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.

  13. मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,

  14. मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.

  15. याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले:

  16. सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.

  17. अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

  18. अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती.

  19. नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

  20. “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर.

  21. यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत.

  22. याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”

  23. अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.

  24. मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.

  25. याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.