मुख्य मजकुरावर जा

Aaron

331 वचने · 9 कुटुंब सदस्य

Aaron चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले.

  2. मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले.

  3. मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला.

  4. नंतर मोशे व अहरोन सभामंडपात गेले. ते परत बाहेर आले, तेव्हा त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला आणि याहवेहचे वैभव सर्वांना प्रकट झाले.

  5. अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते.

  6. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.

  7. मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”

  8. मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील.

  9. मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली,

  10. अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे.

  11. जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला.

  12. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?”

  13. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  14. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  15. “जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र यापैकी एकाकडे आणावे.

  16. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  17. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  18. अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले.

  19. याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

  20. “अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.

  21. “अहरोनाने स्वतःच्या पापार्पणाचा गोर्‍हा परमेश्वराला पहिल्याने अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी प्रायश्चित्त करावे.

  22. दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड.

  23. नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा.

  24. “अहरोनाने स्वतःसाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी पापार्पणाच्या गोर्‍ह्याचा वध करून प्रायश्चित्त करावे.

  25. मग अहरोन आपले दोन्ही हात बोकडाच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांचे सर्व अन्याय, बंडखोरी—त्यांची सर्व पापे—त्या बोकडाच्या मस्तकावर ठेवावी व नेमलेल्या माणसाद्वारे त्या बोकडाला रानात पाठवून द्यावे.