मुख्य मजकुरावर जा

Aaron

331 वचने · 9 कुटुंब सदस्य

Aaron चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”

  2. याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.

  3. याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले:

  4. ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.

  5. “नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.

  6. “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”

  7. याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले,

  8. आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे.

  9. गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.

  10. सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.

  11. अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”

  12. मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्‍यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  13. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  14. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  15. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  16. मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  17. अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

  18. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

  19. “अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.”

  20. याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले.

  21. अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”

  22. मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे.

  23. मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.

  24. मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले.

  25. लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले.