Skip to content

Vision बद्दल बायबलमधील वचने

116 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.”

  2. एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

  3. दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला.

  4. त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले.

  5. त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे.

  6. तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती.

  7. मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.”

  8. “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.”

  9. दुसर्‍या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.”

  10. असे तीन वेळा झाले, मग लागलीच ती चादर पुन्हा स्वर्गात वर घेतली गेली.

  11. त्या दृष्टान्ताचा काय अर्थ असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता, कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांना शिमोनाचे घर सापडले आणि ती बाहेर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली.

  12. त्यांनी हाक मारून अशी विचारणा केली, “शिमोन, ज्याला पेत्र असेही म्हणतात, येथेच राहत आहेत काय?”

  13. पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही.

  14. तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.

  15. “एखाद्या पशूने त्या पर्वताला स्पर्श केला, तर त्याला मरेपर्यंत धोंडमार करावी,” ही परमेश्वराची आज्ञा त्यांच्या सहनशक्ती पलीकडे होती.

  16. स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.”