Vision बद्दल बायबलमधील वचने: Of Job, of a spirit
Of Job, of a spirit बद्दल वचने
“गुप्तपणे मला वचन सांगण्यात आले, माझ्या कानांनी त्याची कुजबुज ऐकली.
रात्रीच्या अस्वस्थ स्वप्नात, जेव्हा लोकांना गाढ झोप लागते,
तेव्हा मी भयभीत झालो आणि घाबरून त्रस्त झालो त्यामुळे माझी सर्व हाडे थरथरली.
माझ्या मुखासमोरून एक आत्मा गेला, आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
तो थांबला, परंतु काय आहे ते मात्र मला समजेना. त्याचा आकार माझ्या डोळ्यासमोर होता, आणि त्याचे कुजबुजणे मी ऐकले: