मुख्य मजकुरावर जा

Vision बद्दल बायबलमधील वचने: A mode of revelation

13 वचने · 17 पैलू

A mode of revelation बद्दल वचने

  1. याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो.

  2. शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.

  3. जखर्‍याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.

  4. एकदा एका दृष्टान्ताद्वारे तुम्ही आपल्या भक्तांशी बोललात: “एका वीर योद्ध्याला मी सामर्थ्याने परिपूर्ण केले आहे; मी सामान्य लोकातून एक तरुण निवडला आहे;

  5. जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो.

  6. त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”

  7. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत!

  8. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.

  9. मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”

  10. “आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  11. ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”

  12. तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.

  13. “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.