मुख्य मजकुरावर जा

Vision बद्दल बायबलमधील वचने: Of the Israelites, of the manifestation of the glory of God

6 वचने · 17 पैलू

Of the Israelites, of the manifestation of the glory of God बद्दल वचने

  1. आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते.

  2. इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे दिसले.

  3. पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही.

  4. तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.

  5. “एखाद्या पशूने त्या पर्वताला स्पर्श केला, तर त्याला मरेपर्यंत धोंडमार करावी,” ही परमेश्वराची आज्ञा त्यांच्या सहनशक्ती पलीकडे होती.

  6. स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.”