मुख्य मजकुरावर जा

Trust बद्दल बायबलमधील वचने

109 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. म्हणून मी इजिप्तला निरुपयोगी राहाब म्हणतो.

  2. जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.

  3. तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,

  4. परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा जे मदत करणारे ते अडखळतील, ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. सर्वजण एकत्र नाश पावतील.

  5. तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

  6. पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय?”

  7. परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील.

  8. जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील, तुझ्या संग्रहातील मूर्तींना तुझा बचाव करू दे! वारा त्या सर्वांना उडवून नेईल, श्वासाच्या एका फुंकराने त्या उडून जातील. परंतु जो कोणी माझा आधार घेतो तो या भूमीचा ताबा घेईल व माझ्या पवित्र पर्वताचा स्वामी होईल.”

  9. कोणी न्यायाने वागत नाही; कोणीही सत्याने खटला लढत नाही. ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात.

  10. तुम्हीही आपले स्थान सोडणार आपले हात डोक्यावर ठेऊन जाल, कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे. ते तुम्हाला मदत करणारच नाहीत.

  11. हाच तुझा वाटा आहे, तुला माझ्याकडून मिळावयाचा वतनभाग हाच होय,” असे याहवेह जाहीर करतात, “कारण तू मला विसरला आहेस आणि खोट्या दैवतांवर विश्वास ठेवलास.

  12. याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.

  13. “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,

  14. कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.

  15. इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,

  16. परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?

  17. तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.

  18. याहवेह चांगले आहेत, संकटसमयी आश्रयस्थान आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात.

  19. “मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे? किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते? स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे; तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही.

  20. ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही.

  21. हे ऐकून त्यांच्या बोलण्याचे शिष्यांना आश्चर्य वाटले. मग येशू पुन्हा म्हणाले, “मुलांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी अवघड आहे.

  22. आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला:

  23. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’

  24. खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे.

  25. त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.