मुख्य मजकुरावर जा

Trust बद्दल बायबलमधील वचने: Woe and curse of false

6 वचने · 66 पैलू

Woe and curse of false बद्दल वचने

  1. याहवेह असे घोषित करतात, “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, पापावर पापाचा ढीग रचतात;

  2. जे माझा सल्ला न घेता इजिप्तकडे जातात; जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात.

  3. जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.

  4. तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,

  5. परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा जे मदत करणारे ते अडखळतील, ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. सर्वजण एकत्र नाश पावतील.

  6. याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.