Skip to content

Trust बद्दल बायबलमधील वचने

109 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला.

  2. शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला.

  3. दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.

  4. तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला.

  5. तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.”

  6. दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो.

  7. दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.

  8. माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, तेच माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारे आहेत; हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात.

  9. “जर माझे घराणे परमेश्वराशी सरळ नसते, तर खचितच त्यांनी माझ्याशी सर्वकाळचा करार, सर्वप्रकारे सुव्यवस्थित व निश्चित केला नसता, खचितच त्यांनी माझे तारण सफल करून माझी प्रत्येक आकांक्षा पूर्ण केली नसती.

  10. तेव्हा बेन-हदादने अहाबास आणखी एक संदेश पाठवला: “जर माझ्या माणसांसाठी शोमरोनात मूठभर माती जरी पुरेशी पडली तरी देव माझे तसे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो.”

  11. हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही.

  12. पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

  13. आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांचा न्याय करणार नाही का? कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्या या विशाल सैन्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही. काय करावे हे आम्हाला कळत नाही, परंतु आमची दृष्टी तुमच्याकडे लागली आहे.”

  14. त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.

  15. ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्‍या जाळासारखे आहे.

  16. जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन.

  17. निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही.

  18. त्याच्या सुरक्षित डेर्‍यांतून त्याला फाडून भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे.

  19. त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.

  20. त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.

  21. परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत; त्यांना सदैव हर्षगीते गाऊ द्या. तुम्ही त्यांचे रक्षण करता, ज्यांना तुमचे नाव प्रिय आहे, त्यांनी तुमच्यामध्ये आनंद करावा.

  22. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  23. संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”

  24. कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.

  25. मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.