Skip to content

Trust बद्दल बायबलमधील वचने

109 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या जिवाचे रक्षण करा आणि मला वाचवा; मला लज्जित होऊ देऊ नका, कारण मी तुमच्या आश्रयास आलो आहे.

  2. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नका; आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.

  4. परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”

  5. दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते.

  6. त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे, कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे.

  7. याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.

  8. जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील; जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत.

  9. हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते.

  10. याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.

  11. तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:

  12. याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.

  13. जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्‍यांच्या वार्‍यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.

  14. मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही. माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही.

  15. जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात, आणि आपल्या धनाच्या संपन्नतेची फुशारकी मारतात?

  16. “पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्‍यांचा नाश करून तो बलवान झाला!”

  17. परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे; परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी सदासर्वकाळ विसंबून आहे.

  18. मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार?

  19. माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला

  20. तुमच्या अद्भुत आणि नीतिकार्याद्वारे तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देता, परमेश्वर, आमचे तारणकर्ता, पृथ्वीच्या टोकापर्यंत आणि दुर्गम समुद्रापर्यंत, तुम्ही सर्व भक्तांची आशा आहात.

  21. प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.

  22. कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही; ते आपली सुटका करतील असा भरवसा ठेवला नाही.

  23. ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील, म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये.

  24. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  25. हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.