Skip to content

Titus बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते.

  2. यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील.

  3. पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत:

  4. मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा.

  5. परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.

  6. मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते.

  7. मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्‍या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.

  8. त्याच्या केवळ येण्याने नव्हे परंतु तुम्ही त्याचे जे सांत्वन केले त्यामुळेही, माझ्यासंबंधाने तुमची उत्सुकता, तुमचे अति दुःख, तुमची माझ्यावरील आस्था या सर्वगोष्टी त्याने मला सांगितल्या, तेव्हा माझा आनंद पूर्वीपेक्षाही ओसंडून वाहू लागला.

  9. या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले.

  10. मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत!

  11. ज्या रीतीने भयाने व थरथर कापत तुम्ही सर्वांनी आज्ञांकितपणा दाखवून त्याचा स्वीकार केला, या सर्वगोष्टी आठवून, तुमच्याविषयीची त्याची प्रीती अधिक वाढली आहे.

  12. म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.

  13. जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.

  14. त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे.

  15. शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे.

  16. खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल.

  17. कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत.

  18. फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.

  19. मी तुमच्याकडे आणखी एका बंधूला पाठवित आहे. तो पुष्कळ प्रकारे आस्थेवाईक असल्याचे आम्हाला अनुभवाने माहीत आहे, कारण त्याचा तुमच्यावर अधिक भरवसा आहे.

  20. तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.

  21. ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का?

  22. तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?

  23. नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले.

  24. मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्‍यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो.

  25. माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही.