The Trinity बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली.
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.
“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.
केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्या सर्पाला विंधले आहे.
परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे; आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो.
तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?
त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.
याहवेह हे असे म्हणतात— जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो.
तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील, व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.
नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल.
“माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय? जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.” असे याहवेह जाहीर करतात. मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय? असे याहवेह जाहीर करतात.
आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही),
“हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.
येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला;
आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”
येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका.
यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;
परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल.
यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.
कारण मी तुम्हाला योग्य शब्द आणि सुज्ञपणाचे विचार सुचवेन की ज्यास तुमचे शत्रू तुम्हाला अडविण्यास किंवा त्याचे खंडन करण्यास असमर्थ ठरतील.
शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही.
येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”
हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कुठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही,
मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही.
परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल.