Skip to content

The Trinity बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, ते असे म्हणतात.

  2. त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते:

  3. हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? कारण तुम्हीच पवित्र आहात! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”

  4. मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.