Skip to content

The Trinity बद्दल बायबलमधील वचने: Salvation the work of

6 वचने · 19 पैलू

Salvation the work of बद्दल वचने

  1. परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.

  2. आमच्या शुभवार्तेद्वारे त्यांनी तुम्हाला यासाठी पाचारण केले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवात तुम्ही सहभागी व्हावे.

  3. जेव्हा आपल्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रीती प्रकट होण्याची वेळ आली,

  4. तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण हे आपण केलेल्या नीतिच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे.

  5. त्यांनी आपले तारणकर्ता येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर विपुलतेने पवित्र आत्मा ओतला आहे,

  6. जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले: