मुख्य मजकुरावर जा

The Trinity बद्दल बायबलमधील वचने: Doctrine of proved from Scripture

17 वचने · 19 पैलू

Doctrine of proved from Scripture बद्दल वचने

  1. येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला;

  2. आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”

  3. यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;

  4. तुम्ही देहाच्या सत्तेखाली नाही, परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही आत्म्याच्या सत्तेखाली आहात, जर कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करीत नाही, तर तो ख्रिस्ताचा नाही.

  5. याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.

  6. निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे.

  7. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.

  8. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.

  9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.

  10. जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते.

  11. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा;

  12. एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत.

  13. जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:

  14. परंतु तुम्ही, प्रिय मित्रांनो, स्वतःला परमपवित्र विश्वासाच्या पायावर बांधा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करा.

  15. आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्यांच्या कृपेने ज्या अनंतकाळच्या जीवनात नेणार आहेत त्याची वाट पाहत असताना आपणास परमेश्वराच्या प्रीतीमध्ये राखा.

  16. योहानाकडून,

  17. आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो. त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे