Skip to content

The Sun बद्दल बायबलमधील वचने

76 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’

  2. पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्‍यांसोबत होता.

  3. तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”

  4. सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला.

  5. यशायाहने उत्तर दिले, “याहवेहचे हे चिन्ह तुझ्यासाठी आहे, जे अभिवचन याहवेहने दिले आहे त्याप्रमाणे ते करतील: तू सांग, सावली दहा पावले पुढे जावी कि दहा पावले मागे जावी?”

  6. मग यशायाह संदेष्ट्याने याहवेहला हाक मारली, आणि याहवेहने आहाजाच्या सूर्य घड्याळावर सावली दहा पावले मागे सरकविली.

  7. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  8. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.

  9. त्याने यहूदीयाच्या प्रत्येक नगरातील उच्च स्थाने व धूप जाळण्याची प्रत्येक वेदी उद्ध्वस्त केली आणि त्याच्या काळात राज्यास शांतता लाभली.

  10. त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले.

  11. ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्‍यांचा प्रकाश मुद्रित करतात.

  12. मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे; मी सभेत उभा राहून मदतीची याचना करतो.

  13. आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे, जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो.

  14. तो आकाशाच्या एका टोकास उगवतो दुसर्‍या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो; त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.

  15. आसाफाचे स्तोत्र. सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.

  16. दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे; सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.

  17. कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.

  18. त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे.

  19. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.

  20. दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही, आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.

  21. दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य, त्यांची करुणा सनातन आहे.

  22. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.

  23. प्रकाश मधुर आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांना रम्य आहे.

  24. मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे. माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले; पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले.

  25. जो पहाटेसारखा प्रसन्न, चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, मिरवणुकीतील तार्‍यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?