मुख्य मजकुरावर जा

The Righteousness of God बद्दल बायबलमधील वचने

73 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वरा, तुमचे नीतिमत्व आकाशापर्यंत अत्यंत उंच आहे; तुम्ही केलेली कृत्ये अद्भुत आहेत, परमेश्वरा, तुमच्यासारखा दुसरा कोण आहे?

  2. तुमच्या न्यायीपणाचे वर्णन माझी जीभ दिवसभर करेल, कारण मला अपाय करण्याची योजना करणारे सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.

  3. असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.

  4. माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.

  5. दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.

  6. जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.

  7. ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.

  8. मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.

  9. प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

  10. सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.

  11. मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत; धार्मिकता आणि न्याय त्यांच्या राजासनाचा पाया आहे.

  12. आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते; संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते.

  13. याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे, आणि राष्ट्रांसमक्ष आपली नीतिमत्ता प्रकाशित केली आहे.

  14. ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.

  15. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.

  16. गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.

  17. याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत; आपले परमेश्वर करुणामय आहेत.

  18. जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन, तेव्हा सात्विक हृदयाने तुमचे उपकारस्मरण करेन.

  19. तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे! तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा.

  20. मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन.

  21. माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता माझे डोळे अंधुक झाले आहेत.

  22. हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात, आणि तुमचे नियमही अचूक आहेत.

  23. तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत.

  24. तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे, आणि तुमचे नियम सत्य आहेत.

  25. तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन.