मुख्य मजकुरावर जा

The Resurrection बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात?

  2. जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही.

  3. आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.

  4. यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही.

  5. जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही;

  6. आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाले नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुम्ही अजूनही तुमच्या पापातच आहात.

  7. आणि तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे.

  8. जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.

  9. परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे.

  10. कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे.

  11. कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील

  12. प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील.

  13. आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?”

  14. किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही.

  15. तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्‍या कशाचे तरी असते.

  16. मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.

  17. सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्‍या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक.

  18. त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्‍या प्रकारचे आहे.

  19. सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.

  20. अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते.

  21. अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते.

  22. नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे.

  23. असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.

  24. प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे.

  25. पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.