The Resurrection बद्दल बायबलमधील वचने: Is not contrary to reason
Is not contrary to reason बद्दल वचने
मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो.
आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?”
किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही.
तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्या कशाचे तरी असते.
मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.
सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक.
त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्या प्रकारचे आहे.
सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्या प्रकारचे आणि तार्यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्यांचेही तेज वेगवेगळे असते.
अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते.
अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते.
नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे.
असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.
प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे.
पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.
जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत.
आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.