मुख्य मजकुरावर जा

The Promises of God बद्दल बायबलमधील वचने

90 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत.

  2. परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

  3. मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”

  4. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.

  5. तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे.

  6. तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.

  7. विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करतीलच हे तिला माहीत होते.

  8. विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली;

  9. जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.

  10. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का?

  11. याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्‍या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.

  12. सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील.

  13. ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”

  14. परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.

  15. त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे.