मुख्य मजकुरावर जा

The Promises of God बद्दल बायबलमधील वचने: Christ

6 वचने · 57 पैलू

"The Promises of God" साठी शोधा

Christ बद्दल वचने

  1. जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.

  2. तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.

  3. शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्‍या प्रत्येक गोष्टी तो करेल.’

  4. “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे.

  5. ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,” म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे.

  6. तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले.