मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले.

  2. मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.

  3. यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल.”

  4. पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले,

  5. तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली.

  6. सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”

  7. पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”

  8. नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली.

  9. आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो.

  10. जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.”

  11. येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”

  12. मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,”

  13. कारण असे लिहिले आहे: “ ‘तुझे रक्षण व्हावे म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल;

  14. तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ”

  15. येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”

  16. या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला.

  17. “परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.

  18. प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”

  19. तरी त्या पंथाचे परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी शिष्यांजवळ तक्रार केली, “तुम्ही जकातदार व पापी लोकांबरोबर खाणे व पिणे का करता?”

  20. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.

  21. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.”

  22. “तुम्ही मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे का म्हणता आणि मी जे सांगितले ते करीत नाही?

  23. असे प्रत्येकजण जे माझ्याकडे येतात आणि माझी वचने ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, ते कशाप्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवितो.

  24. ते कोणाएका मनुष्यासारखे आहेत, ज्याने खोल पाया खणून आपले घर खडकावर बांधले. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा त्या घरावर जोराने आदळला; तरी त्यामुळे ते घर हलू शकले नाही, कारण ते भक्कमपणे बांधले होते.

  25. जे कोणी माझी वचने ऐकतात पण ते आचरणात आणत नाहीत, तर ते पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखे आहेत. ज्या क्षणी जोराचा प्रवाह त्या घरावर आदळला, त्याच क्षणी ते कोसळले आणि त्याचा संपूर्ण नाश झाला.”