मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर मुख्य याजक, मंदिराच्या द्वारपालांचे अधिकारी आणि वडीलजन यांना येशूंनी म्हटले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय की तुम्ही तरवारी व लाठ्या घेऊन आला आहात?

  2. मी दररोज मंदिराच्या परिसरात तुमच्याबरोबर होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. परंतु आता हीच तुमची वेळ आहे, येथे अंधाराची सत्ता आहे.”

  3. शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता.

  4. आणि जेव्हा काहीजणांनी तिथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला.

  5. एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.”

  6. पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”

  7. थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला.

  8. सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!”

  9. हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

  10. प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  11. पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

  12. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटेस, त्या स्त्रियांनी त्यांनी तयार केलेले मसाले घेतले आणि त्या कबरेकडे गेल्या;

  13. तिथे त्यांनी पाहिले की तो दगड कबरेपासून दूर सरकवलेला आहे,

  14. परंतु जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना प्रभू येशूंचे शरीर सापडले नाही.

  15. याबद्दल ते आश्चर्य करीत असतानाच, अकस्मात त्यांच्या बाजूला विजेसारखी चकाकणारी वस्त्रे घातलेले दोन पुरुष उभे राहिले.

  16. त्यामुळे त्या स्त्रिया भयभीत झाल्या व खाली वाकून त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली. पण ते पुरुष त्यांना म्हणाले, “जे जिवंत आहेत त्यांना तुम्ही मृतांमध्ये का शोधता?

  17. ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा.

  18. ‘मानवपुत्र दुष्ट लोकांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाईल, त्यांना क्रूसावर खिळून मारण्यात येईल आणि ते तिसर्‍या दिवशी पुन्हा उठतील.’ ”

  19. तेव्हा त्यांना त्यांचे शब्द आठवले.

  20. मग कबरेपासून परत येऊन त्यांनी येशूंच्या अकरा शिष्यांना आणि इतर सर्वांना हे वर्तमान सांगितले.

  21. ज्या स्त्रिया कबरेकडे गेल्या होत्या, त्यात मरीया मग्दालिया, योहान्ना, याकोबाची आई मरीया आणि इतर ज्या त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी हे प्रेषितांना सांगितले.

  22. परंतु त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना त्यांचे शब्द मूर्खपणाचे वाटले.

  23. पेत्र कबरेजवळ धावत गेला व त्याने आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या पट्ट्या पडलेल्या दिसल्या, तेव्हा काय घडले असावे याविषयी तो आश्चर्य करीत परत गेला.

  24. आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.

  25. ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.