मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने

726 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा आमच्यात त्राण उरले नाही असे वाटले तेव्हा, ॲथेन्स इथे थांबून राहणे उत्तम वाटले.

  2. ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रसार कार्य करणारा आमचा बंधू आणि परमेश्वराच्या सेवेतील सहकर्मी असलेला तीमथ्य, त्याने तुम्हाला विश्वासात बळकट व प्रोत्साहित करावे म्हणून आम्ही त्याला पाठविले आहे.

  3. कारण तुम्हाला आमचे अनुकरण कसे करावयाचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहत असताना आळशी नव्हतो.

  4. आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले.

  5. याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून तुम्हाला आदर्श झालो.

  6. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका.

  7. याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.

  8. मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.

  9. कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे.

  10. मला त्या शुभवार्तेची घोषणा करणारा, प्रेषित आणि शिक्षक म्हणून निवडले आहे.

  11. याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे.

  12. जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा.

  13. या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही.

  14. परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना माझ्या दुःखसहनाकडून ख्रिस्त येशूंमध्ये तारण आणि सार्वकालिक गौरव मिळणार असेल, तर मी ती दुःखे आनंदाने सोशीन.

  15. परंतु माझी शिकवण, वागणूक, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर

  16. आणि अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या शहरात आलेली संकटे आणि माझा झालेला छळ हे तुला पूर्ण माहीत आहे. परंतु या सर्वांतून प्रभूनेच मला सोडविले.

  17. त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.

  18. आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे,

  19. बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली.

  20. त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते,

  21. पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे.

  22. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,

  23. व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले.

  24. इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता.

  25. विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले.