मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने: General references

121 वचने · 5 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”

  2. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो!

  3. परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.

  4. नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.

  5. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,

  6. जरी त्याने पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते.

  7. माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत.

  8. यहूदीया येथील सर्व लोकांनी या शपथेबद्दल आनंद केला, कारण त्यांनी संपूर्ण अंतःकरणापासून ती शपथ घेतली होती. त्यांनी उत्सुकतेने परमेश्वराचा शोध घेतला आणि ते त्यांना सापडले. त्यामुळे याहवेहनी त्यांना सर्व बाजूंनी विश्रांती दिली.

  9. कसेही असले तरी, तुमच्यामध्येही काही चांगले आहे, कारण तुम्ही अशेरा खांब देशातून काढून टाकले आहेत आणि परमेश्वराचा शोध घेण्याकडे तुमचे अंतःकरण लावले आहे.”

  10. स्वर्गातील परमेश्वराच्या आज्ञेनुसार लागेल ते सर्व काळजीपूर्वकपणे पुरवावे. कारण स्वर्गातील परमेश्वराचा क्रोध राजावर आणि त्याच्या पुत्रांवर येण्याचा धोका आपण का पत्करावा?

  11. तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे; माझा कैवारी उच्चस्थानी आहे.

  12. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील. हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.

  13. माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?

  14. परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्‍यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला

  15. याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.

  16. सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.

  17. राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.” सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील.

  18. माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात.

  19. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.

  20. जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान.

  21. तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील आणि प्राचीन पाये पुन्हा उभारतील; भग्न झालेली तटबंदी दुरुस्त करणारे, बांधकाम व रस्ते पूर्वस्थितीत आणणारे असे तुम्ही म्हणविले जाल.

  22. “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.

  23. अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,

  24. आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.

  25. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.