मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने

726 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?

  2. आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे.

  3. कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल.

  4. होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.

  5. या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो.

  6. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे.

  7. आपण सत्याविरूद्ध काही करू शकत नाही, परंतु सत्यासाठीच करू शकतो.

  8. तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे.

  9. आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन.

  10. कारण तुम्ही ऐकलेच आहे की, यहूदी धर्मात असताना माझे पूर्वीचे जीवन कसे होते, कशाप्रकारे उग्र रूप धारण करून मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला आणि त्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न केला.

  11. माझ्या लोकांमध्ये माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा मी यहूदी धर्मसंप्रदायात अधिक पुढे जात होतो आणि माझ्या पूर्वजांच्या परंपरेविषयी अत्यंत आवेशी होतो.

  12. परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलाविले, त्यांना हे योग्य वाटले की

  13. त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूंच्या शुभवार्तेची घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये.

  14. मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्‍यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो.

  15. अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते.

  16. तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.

  17. ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.

  18. आस्था असणे आणि उद्देश चांगला असणे गरजेचे आहे, केवळ मी तुमच्याबरोबर आहे तेव्हाच नव्हे तर नेहमीच असे असणे आवश्यक आहे.

  19. माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील.

  20. बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते.

  21. योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.

  22. यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्‍यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत.

  23. “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका.

  24. एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.

  25. म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या.