Skip to content

Nineveh बद्दल बायबलमधील वचने

49 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.

  2. ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.

  3. रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; ते वीजगतीने दौडत आहेत.

  4. नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत आणि राजवाडे ढासळत आहेत.

  5. अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे, की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे. तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत आणि त्यांचे ऊर बडवित आहेत.

  6. निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे जिचे पाणी गळून चालले आहे. “थांबा, थांबा,” ते ओरडतात, पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही.

  7. चांदी लुटा! सोने लुटा! निनवेहची संपत्ती येथील मौल्यवान वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे!

  8. हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो, लबाड्यांनी गच्च भरलेली, लूटमाऱ्यांनी भरलेली, कधीही पीडितांशिवाय नसणारी!

  9. चाबकांच्या फटकार्‍यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ!

  10. आक्रमक घोडेस्वारांची पलटण लखलखणार्‍या तलवारी चमचमणारे भाले! पडलेली अनेक प्रेते, सर्वत्र मृतांचे ढीग, अगणित मृत शरीरे, प्रेतांना अडखळून पडणारे लोक—

  11. या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.

  12. सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे, मी तुझे वस्त्र तुझ्या चेहऱ्यावर उचलेन. तुझी नग्नता सर्व राष्ट्रांना आणि तुझी लज्जा सर्व देशांना दाखवेन.

  13. मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन, मी तुला अपमानित करेन आणि तुला तमाशा बनवेन.

  14. तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील, ‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’ तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?”

  15. असे असूनही थीब्जचा पाडाव झाला आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. तिच्या अधिकार्‍यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.

  16. तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.

  17. तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत; जेव्हा ते हलविले जातात, तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.

  18. तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा— ते सर्व दुर्बल आहेत. तुझ्या देशाच्या वेशी तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत; तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत.

  19. तू तुझ्या व्यापार्‍यांची संख्या वाढविली आहे त्यांची संख्या आकाशातील तार्‍यांपेक्षाही जास्त वाढली आहे, परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात व मग ते उडून जातात.

  20. ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.

  21. कळप व मेंढरे सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील. तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे तिच्या स्तंभावर निवारा घेतील. घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल, तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील, देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील.

  22. ही नगरी चैनबाजी करणारी, सुरक्षितेत वसणारी होती. ती स्वतःशी म्हणत असे, “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून त्यांचे डोके हलवितात.

  23. न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.

  24. न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.