मुख्य मजकुरावर जा

Nineveh बद्दल बायबलमधील वचने: Coming up of the Babylonish armies against

5 वचने · 35 पैलू

Coming up of the Babylonish armies against बद्दल वचने

  1. हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे. आपल्या गडांवर पहारा दे, मार्गांची रखवाली कर, मोर्चा बांध, आपल्या सर्व शक्तिनिशी सैन्यांची संरक्षक फळी मजबूत कर!

  2. जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.

  3. ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.

  4. रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; ते वीजगतीने दौडत आहेत.

  5. चाबकांच्या फटकार्‍यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ!