Skip to content

Murder बद्दल बायबलमधील वचने

131 वचने · 88 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘जो कोणी एखाद्याचा खून करतो त्याला केवळ साक्षीदाराच्या साक्षीनुसारच जिवे मारावे. परंतु केवळ एकाच साक्षीच्या आधारावर कोणाला जिवे मारू नये.

  2. “ ‘खुनी व्यक्तीच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये, जो दोषी मरणास पात्र आहे त्याला अवश्य जिवे मारावे.

  3. “ ‘जो आश्रयाच्या नगरात पळून गेला आहे, त्याने महायाजकाच्या मृत्यूच्या आधी आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहावे म्हणून त्याच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये.

  4. “ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही.

  5. तुम्ही खून करू नका.

  6. परंतु कोणी द्वेषाने दबा धरून राहील व आपल्या शेजार्‍यावर अचानक प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करेल आणि मग यापैकी एखाद्या शहरात पळून जाईल,

  7. तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्‍याच्या स्वाधीन करावे.

  8. त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल.

  9. केवळ एकाच साक्षीदाराच्या साक्षीवर तुम्ही कोणालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल किंवा अपराधाबद्दल कदापि दोषी ठरवू नये. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.

  10. याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,

  11. तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे.

  12. नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी

  13. आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्‍यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी.

  14. यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.

  15. मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,

  16. आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही.

  17. हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल,

  18. आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.

  19. अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा, कारण आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा ते सूड उगवतील; आणि शत्रूंचा प्रतिशोध घेतील, आणि आपला देश आणि आपले लोक यांच्याकरिता प्रायश्चित करतील.

  20. तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला.

  21. यरूब्बआलाच्या सत्तर पुत्रांचा विरोधात केलेल्या अपराधाचा, त्यांचा रक्तपात करण्याचा, त्यांचा भाऊ अबीमेलेख आणि शेखेमाच्या नागरिकांवर ज्यांनी अबीमेलेखाचा त्याच्या बंधूंची हत्या करण्यास साहाय्य केले होते, त्यांचा सूड घेण्यास परमेश्वराने असे केले.

  22. कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.”

  23. आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले.

  24. गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले.

  25. ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके कापले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले.