Murder बद्दल बायबलमधील वचने: Connected with idolatry
Connected with idolatry बद्दल वचने
म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. यावरून इस्राएली सैन्याविरुद्ध प्रकोप आला; व ते माघारी आपल्या देशाला परतले.
आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस,
जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन.