Murder बद्दल बायबलमधील वचने: Requires blood for
Requires blood for बद्दल वचने
आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार.
“ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही.
त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.