Skip to content

Murder बद्दल बायबलमधील वचने

131 वचने · 88 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये.

  2. जे कोणी भावाचा आणि बहिणीचा द्वेष करतात ते खुनी आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही खुनी व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही.

  3. त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?”

  4. “पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”

  5. पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन, यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले.

  6. नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील.