Skip to content

Land बद्दल बायबलमधील वचने

123 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली.

  2. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे.

  3. अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.”

  4. त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले.

  5. सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली.

  6. त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.”

  7. जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.”

  8. राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले. मग त्याने आपल्या एका अधिकार्‍याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.”

  9. दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.”

  10. आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत.

  11. आम्ही त्यांचेच बांधव आहोत आणि आमची मुले त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत, तरीसुद्धा जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आम्हाला आमची मुले व मुली गुलाम म्हणून कामाला लावावी लागतात. आमच्या काही कन्या आम्ही आधीच गुलाम म्हणून विकलेल्या आहेत, पण आम्ही असमर्थ आहोत, कारण आमची शेते व द्राक्षमळेसुद्धा इतरांचे झाले आहेत.”

  12. शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’

  13. “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;

  14. मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले.

  15. साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली.

  16. नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली—

  17. आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.

  18. “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या:

  19. ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव.

  20. कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’

  21. “मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली.

  22. जे वाईट कृत्याची योजना करतात, जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.

  23. ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात, दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात. ते कपटाने लोकांची घरे बळकावतात आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात.

  24. “दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.

  25. हंगामाचे दिवस आल्यावर फळातून काही मिळावे म्हणून त्याने नोकरांना शेतकर्‍यांकडे पाठविले.