Skip to content

Land बद्दल बायबलमधील वचने

123 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “परंतु शेतकर्‍यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्‍याला ठार केले आणि तिसर्‍याला दगडमार केला.

  2. मग जमीनदाराने त्यांच्याकडे पहिल्या वेळेपेक्षा जास्त नोकर पाठविले. पण त्यांनाही त्यांनी तसेच केले.

  3. सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’

  4. “पण शेतकर्‍यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’

  5. त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला.

  6. “आता, जेव्हा द्राक्षमळ्याचा धनी येईल, त्यावेळी तेव्हा तो त्या भाडेकर्‍यांचे काय करेल असे तुम्हाला वाटते?”

  7. त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्‍या शेतकर्‍यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”

  8. नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो बर्‍याच दिवसासाठी दूर निघून गेला.

  9. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे, म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला. परंतु शेतकर्‍यांनी त्याला मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठवून दिले.

  10. त्याने दुसर्‍या सेवकाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु त्यांनी त्यालासुद्धा मारले आणि लज्जास्पद वागणूक दिली व रिकाम्या हाताने परत पाठविले.

  11. तरी त्याने तिसर्‍याला पाठविले आणि त्यांनी त्याला जखमी केले आणि मळ्याबाहेर फेकून दिले.

  12. “तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी स्वतःशीच म्हणाला, ‘मी काय करावे बरे? आता माझा पुत्र ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याला त्यांच्याकडे पाठवितो. कदाचित ते त्याचा मान राखतील.’

  13. “पण शेतकर्‍यांनी मालकाच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे. आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’

  14. तेव्हा त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून त्याला मारून टाकले. “आता त्या द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करेल?

  15. तो येईल आणि त्या भाडेकर्‍यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.” लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते म्हणाले, “परमेश्वर करो असे कधीही न होवो!”

  16. आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला.

  17. मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले.

  18. परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस?

  19. संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.”

  20. हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले.

  21. नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला.

  22. सुमारे तीन तासानंतर त्याची पत्नी आत आली, काय घडले होते याची तिला कल्पना नव्हती.

  23. पेत्राने तिला विचारले, मला सांग “तुला व हनन्याला जमिनीची इतकीच किंमत मिळाली काय?” तिने उत्तर दिले, “होय, तितकीच किंमत.”