मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा मोशेने भूमीस लवून उपासना केली.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले, “हे शब्द लिही, कारण या शब्दांनुसार मी तुझ्याशी व इस्राएलाशी करार केला आहे.”

  3. मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.

  4. जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.

  5. मग याहवेह मोशेला म्हणाले:

  6. “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा.

  7. त्यामध्ये कराराच्या नियमाचा कोश ठेवावा आणि कोश पडद्याने झाकावा.

  8. मेज आत आणून त्यावरचे सामान व्यवस्थित लावावे. मग दीपस्तंभ आत आणावा व त्याचे दिवे लावावे.

  9. कराराच्या नियमाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेवावी आणि निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावावा.

  10. “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारापुढे, सभामंडपापुढे होमार्पणाची वेदी ठेवावी.

  11. सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवून त्यात पाणी भरावे.

  12. त्याभोवती अंगण करावे आणि त्या अंगणाच्या प्रवेशद्वारास पडदा लावावा.

  13. “अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडप व त्यातील प्रत्येक वस्तूवर अभिषेक करावा, ते व त्यातील सर्व सामान वेगळे करावे म्हणजे ते पवित्र होईल.

  14. मग होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे यांचा अभिषेक करावा; वेदीला पवित्र करावे म्हणजे ती वेदी परमपवित्र होईल.

  15. मग गंगाळ व त्याच्या बैठकीस अभिषेक कर व ते समर्पित कर.

  16. “अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे.

  17. मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

  18. त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

  19. जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”

  20. जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले.

  21. दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली.

  22. जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले.

  23. मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  24. मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले.

  25. मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.