मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;

  2. योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;

  3. बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;

  4. दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;

  5. आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;

  6. गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;

  7. नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”

  8. हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.

  9. मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,

  10. आणि दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली.

  11. याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:

  12. इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  13. रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.

  14. शिमओनाच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

  15. शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.

  16. गादच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  17. गाद गोत्रांची संख्या 45,650 होती.

  18. यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  19. यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.

  20. इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  21. इस्साखार गोत्रांची संख्या 54,400.

  22. जबुलूनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  23. जबुलून गोत्रांची संख्या 57,400.

  24. योसेफाच्या पुत्रांमधून: एफ्राईमच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  25. एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500.