मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 59,300 होती.

  2. त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे.

  3. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 45,650 होती.

  4. रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्‍या रांगेत निघतील.

  5. मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे.

  6. पश्चिमेच्या बाजूस: एफ्राईमच्या दलाने आपल्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. एफ्राईमच्या लोकांचा पुढारी अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा आहे.

  7. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 40,500 होती.

  8. मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे.

  9. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 32,200 होती.

  10. त्यानंतर बिन्यामीनचे गोत्र असणार. बिन्यामीन लोकांचा पुढारी गिदयोनीचा पुत्र अबीदान आहे.

  11. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 35,400 होती.

  12. एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्‍या रांगेत निघतील.

  13. उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.

  14. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 62,700 होती.

  15. आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे.

  16. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 41,500 होती.

  17. नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.

  18. त्यांच्या दलातील लोकांची संख्या 53,400 होती.

  19. दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील.

  20. आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती.

  21. याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती.

  22. अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत.

  23. सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.

  24. अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

  25. अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती.