मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह मोशेला म्हणाले,

  2. “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर.

  3. त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत.

  4. सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.

  5. यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत.

  6. आणि याहवेह मोशेला म्हणाले,

  7. “इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत,

  8. कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”

  9. इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले,

  10. “इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा.

  11. नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.”

  12. तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.

  13. त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

  14. यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.

  15. सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता,

  16. आणि हेलोनाचा पुत्र एलियाब जबुलून वंशाच्या दलावर होता.

  17. मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले.

  18. त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता.

  19. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता.

  20. आणि देउएलाचा पुत्र एलीआसाफ हा गाद वंशाच्या दलावर होता.

  21. मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा.

  22. एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता.

  23. पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता,

  24. आणि गिदोनाचा पुत्र अबीदान हा बिन्यामीन वंशाच्या दलावर होता.

  25. शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता.