Skip to content

Jerusalem बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 117 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जेव्हा यहूदीयांच्या मंडपाचा सण जवळ आला,

  2. येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल.

  3. ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.”

  4. कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.

  5. यावर येशूंनी त्यांना म्हटले, “माझी वेळ अद्यापि आलेली नाही; तुम्हाला कोणतीही वेळ योग्यच आहे.

  6. जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो.

  7. तुम्ही सणास जा. मी या सणास वर जात नाही कारण माझी वेळ अजून आली नाही.”

  8. त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले.

  9. तथापि, असे असूनही, येशूंचे भाऊ सणासाठी गेल्यानंतर, येशूही, उघडपणे नव्हे, तर गुप्तपणे तिथे गेले.

  10. आता सणात यहूदी पुढारी येशूंवर नजर ठेवून विचारपूस करीत होते, “की ते कुठे आहेत?”

  11. समुदायामध्ये त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. काही म्हणत होते, “तो खरोखर चांगला मनुष्य आहे.” तर इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांची फसवणूक करतो.”

  12. परंतु यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे लोकांसमोर त्यांच्याविषयी बोलण्यास कोणीच धजत नव्हते.

  13. मग अर्धा सण पार पडल्यानंतर येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि शिकवू लागले.

  14. जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते.

  15. एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले.

  16. त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.

  17. तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.

  18. त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते.

  19. आता स्तेफन परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असा मनुष्य होता आणि त्याने लोकांमध्ये मोठी आश्चर्यकृत्ये व चिन्हे केली होती.

  20. परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.

  21. परंतु स्तेफन जे आत्म्याच्या ज्ञानाद्वारे बोलला त्याला विरोध करण्यास ते समर्थ ठरले नाहीत.

  22. मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.”

  23. अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथविले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले.

  24. त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले व त्यांनी अशी साक्ष दिली, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो.

  25. ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.”