Skip to content

Integrity बद्दल बायबलमधील वचने

96 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून, मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन,

  2. तर खांद्यापासून माझा हात गळून पडो, सांध्‍यापासून ते तुटून जावोत.

  3. कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे, आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत.

  4. “जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’

  5. जर मी माझे मोठे धन, आणि आपल्या हाताने मिळवलेल्‍या संपत्तीमध्‍ये आनंद बाळगला असेल,

  6. जर आकाशात तळपणार्‍या सूर्याकडे पाहून, अथवा वैभवशाली वाटेने जाणार्‍या चंद्राकडे पाहून,

  7. माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल, आणि आपल्या हाताच्या चुंबनांने मी त्यांची उपासना केली असेन,

  8. तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते.

  9. “माझ्या शत्रूंची आपत्ती पाहून मी जर कधी आनंद मानला असेन, किंवा त्याच्यावर अरिष्ट आले म्हणून मी समाधानी झालो असेन;

  10. त्यांच्या जीवनाच्या विरोधात शाप उच्चारून मी आपल्या मुखाला पाप करू दिले नाही;

  11. जर माझ्या सेवकांपैकी कधी कोणी म्हटले नाही की, ‘असे कोण आहे ज्याने इय्योबाच्या घरी मांस खाल्ले नाही?’

  12. परंतु कोणी अनोळखी व्यक्तीने देखील रस्त्यावर रात्र काढली नाही, कारण प्रवाशांसाठी माझ्या घराचे दार नेहमीच उघडे असे;

  13. अथवा इतर लोकांप्रमाणे मी माझे अपराध झाकून ठेवले असते, व आपला दोष हृदयात लपवला असता

  14. मी कधी मोठ्या जनसमूहाचे भय धरले काय, कुळाच्या तिरस्काराने मी भयभीत झालो काय, शांतपणे मी घराबाहेर पडलो नाही काय—

  15. (“अहा, माझे ऐकणारे कोणी असते! आता माझ्या समर्थनावर मी सही करतो—सर्वसमर्थ मला उत्तर देवो; मला दोष देणार्‍याने लेखी दोषारोप द्यावा.

  16. तो मी खचित खांद्यावर घेऊन वाहिला असता, आणि मी तो मुकुटाप्रमाणे डोक्याला बांधला असता.

  17. मी सर्वसमर्थाला माझ्या प्रत्येक पावलांचा हिशोब दिला असता; एखाद्या राज्यकर्त्या समोर, तसे मी ते त्यांच्यासमोर सादर करेन.)

  18. “किंवा माझी जमीन जर माझ्याविरुद्ध रडत आहे, आणि तिच्या खाचा जर अश्रूंनी ओल्या झाल्या आहेत,

  19. मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल किंवा भाडेकरूंचे मन मोडले असेल,

  20. तर मग गव्हाऐवजी वनझुडूप उगवोत आणि सातूऐवजी तिथे दुर्गंधी गवत येवो.” येथे इय्योबाचे भाषण संपले.

  21. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील,

  22. जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल—

  23. तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला

  24. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  25. ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;