- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Integrity बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.
न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.
तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत, आणि माझी जीभ असत्य उच्चारणार नाही.
मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे; मी मरेपर्यंत, माझी प्रामाणिकता मी नाकारणार नाही.
माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही; मी जिवंत आहे तोपर्यंत माझा विवेक मला दोष देणार नाही.
“मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.
कारण वरून परमेश्वराचा आमच्यासाठी वाटा, किंवा सर्वसमर्थ्याकडून आमचा वारसा काय आहे?
दुष्ट लोकांचा विनाश, आणि पापी लोकांचे अरिष्ट हा नाही काय?
माझे मार्ग परमेश्वर पाहात नाही का आणि माझे प्रत्येक पाऊल ते मोजत नाहीत काय?
“जर मी खोटेपणात चाललो आहे किंवा कपटाकडे माझा पाय घाईने उचलले;
तर परमेश्वर सत्याच्या तराजूत मला तोलून पाहो आणि मी निरपराधी आहे हे त्यांना समजेल—
जर माझे पाऊल मार्गातून भटकले असतील, जर माझ्या हृदयाने माझ्या डोळ्यांचे अनुसरण केले असेल, अथवा माझे हात भ्रष्ट झाले असतील,
तर ज्याची पेरणी मी केली, त्याची कापणी दुसरा कोणी करो, आणि माझे पीक उपटून टाकले जावो.
“जर माझे हृदय परस्त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, अथवा मी शेजार्याच्या दाराशी दडून बसलो आहे,
तर माझी पत्नी परपुरुषाच्या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.
कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.
हा भस्म करणारा अग्नी आहे; जो माझा हंगाम उपटून टाकेल.
“जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्हाणे घेऊन आले, मग ते स्त्री असो वा पुरुष, तेव्हा मी त्यांना न्याय देण्याचे नाकारले असेल,
तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार? मला जाब विचारावयास बोलाविले असता, मी काय उत्तर देणार?
कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय? एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय?
“जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्या असतील अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,
जर मी माझे अन्न स्वतःपाशीच ठेवले, आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही—
परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले, आणि माझ्या जन्मापासून मी विधवांचे मार्गदर्शन केले.
मी जर कोणाला वस्त्राविना, आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,
त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही,